इंदापूरच्या तहसीलदारांवर धक्कादायक हल्ला, असले प्रकार कधीच खपवून घेणार नाही; हर्षवर्धन पाटलांचा इशारा

内容

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर (Indapur Tehsildar Shrikant Patil) अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यामुळे शहरात गोंधळ उडाला असून या घटनेची माहिती घेत राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला केला.

याबाबत हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूरच्या तहसीलदारांच्या (Indapur Tehsildar) गाडीवर आज धक्कादायक प्रकारे हल्ला करण्यात आला आहे. तसेच धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना निषेधार्थ आहे. अशी घटना इंदापूरमध्ये याआधी झाली नाही.

यामध्ये आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई केली जावी, यासाठी पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. असले प्रकार कधी खपवून घेतले जाणार नाहीत. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. सरकारी अधिकारी आपल्या परीने काम करत असतात, मात्र अशा प्रकारे हल्ले होत असतील तर हे चुकीचं आहे, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

总结
Indapur Tehsildar Shrikant Patil was attacked by unknown assailants, causing chaos in the city. Former minister and BJP leader Harshvardhan Patil condemned the incident, calling it unacceptable. He stated that the attack on the tehsildar's vehicle was alarming and should be investigated promptly. This incident is unprecedented in Indapur. Police have been informed to take immediate action and ensure swift investigation. Such attacks on government officials are unacceptable, and steps must be taken to prevent them in the future.