श्रीत्रिविक्रम पूजन - श्रध्दावान सेवा (गुरुपौर्णिमा - २०२४)

contenido

श्रीत्रिविक्रम पूजन - श्रध्दावान सेवा (गुरुपौर्णिमा - २०२४)

सर्व श्रद्धावानांसाठी गुरुपौर्णिमा व अनिरुद्ध पौर्णिमा (म्हणजेच सद्‌गुरुंचा जन्मदिवस) हे दोन्ही उत्सव अतिशय महत्वाचे आहेत कारण या दोन्ही दिवशी सद्‍गुरुंची ’कृपा’ व ’आशीर्वाद’ स्वीकारणे सहज सोपे असते. या वर्षी, २१ जुलै २०२४ रोजी गुरुपौर्णिमेचा उत्सव श्रीहरिगुरुग्राम, न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे (पूर्व) या ठिकाणी अतिशय भक्तीपूर्ण वातावरणात व जल्लोषात पार पडला. मुंबई, तसेच महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून व महाराष्ट्राच्या बाहेरूनही हजारो श्रद्धावान श्रीहरिगुरुग्राम येथे या उत्सवात सहभागी होण्यासाठी आले होते. प्रचंड पाऊस असतानाही श्रद्धावानांनी व कार्यकर्ता सेवकांनी एकमेकांना अतिशय चांगल्या प्रकारे समजून व सांभाळून घेतले.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धावान मनोभावे श्रीत्रिविक्रम पूजन व महापूजन करतात. ज्या श्रद्धावानांना काही कारणामुळे याठिकाणी प्रत्यक्ष येऊन पूजन करणे शक्य होत नाही, अशा श्रद्धावानांच्या सोयीसाठी सद्‌गुरु श्रीअनिरुध्द बापूंच्या संकल्पानुसार ’श्रद्धावान पूजन’ हा पर्याय उपलब्ध असतो. श्रद्धावान पूजनामध्ये या श्रध्दावानांच्या वतीने ’श्रद्धावान सेवक’ पूजन करतात. या पूजनाचा प्रसाद श्रद्धावानांना त्यांच्या उपासना केंद्रांवर पाठविला जातो जेथून ते आपला प्रसाद घेऊ शकतात.

नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात हे श्रद्धावान पूजन ’उत्तर भारतीय संघ’ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या श्रद्धावान पूजनाच्या सेवेत साधारणतः ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते व या कार्यकर्त्यांनी श्रद्धावानांच्या वतीने ’श्रध्दावान पूजन’ केले.

Resumir
गुरुपौर्णिमा आणि अनिरुद्ध पौर्णिमा हे महत्वाचे उत्सव आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रद्धावानांनी श्रीत्रिविक्रम पूजन व महापूजन केले. श्रद्धावान पूजनामध्ये श्रद्धावान सेवक पूजन केले जाते आणि प्रसाद उपासना केंद्रांवर पाठविला जातो. उत्तर भारतीय संघ ने गुरुपौर्णिमा उत्सवात ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि श्रद्धावानांच्या वतीने 'श्रध्दावान पूजन' केले.